घृष्णेश्वर मंदिराचं रूपडं पालटणार! कसं असणार नवं रूप?
पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनंतर घृषणेश्वर मंदिराच्या कळसाला लेप देण्याचं काम सुरु
औरंगाबाद : औरंगाबाद येथील घृष्णेश्वर मंदिराच्या कळसाला लेप देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनंतर घृषणेश्वर मंदिराच्या कळसाला लेप देण्याचं काम सुरु करण्यात आले आहे. जुनं रूप येण्यासाठी मंदिराचं रूपडं पालटण्याचे काम सध्या सुरू आहे. दर दहा ते बारा वर्षांनी मंदिराचे जुनं रूप तसंच रहावं, यासाठी मंदिराचे काम केले जाते. शिवलिंग आणि घृष्णेश्वर मंदिराचं रुपडं जसंच्या तसं रहावं यासाठी काही ठराविक काळानंतर त्यांचं काम करण्यात येतं. कोरोनानंतर पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनंतर मंदिराचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढच्या पिढीला महाराष्ट्रातील हा मंदिर, वास्तुंचा ठेवा बघायला मिळाला, याकरता पुरातत्व विभागाकडून योग्य काम करण्यात येत आहे.
Published on: Feb 03, 2023 10:47 AM