फॉरेन ट्रीप नाही तर शिंदेंचा आपल्या मूळ गावी फेरफटका, गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
परदेशी कशाला जायाचं. गड्या आपला गाव बरा... लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावी काहिसा विसावा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आपलं साताऱ्यातील दरे गाव दाखवत अतिशय मोलाचा संदेश देखील दिला आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचही टप्प्यातील मतदान पार पडले आहेत आणि येत्या ४ जून रोजी याचा निकाल समोर येणार आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता उन्हा-तान्हात जोरदार प्रचार केला होता…यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कमी पडले नाही. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावी काहिसा विसावा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आपलं साताऱ्यातील दरे गाव दाखवत अतिशय मोलाचा संदेश देखील दिला आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या व्हीडिओच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. ‘लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. तर परदेशी कशाला जायाचं. गड्या आपला गाव बरा.. शेत पिकाची दुनिया न्यारी…वसे जिथे विठूरायाची पंढरी….’, असेही यामध्ये त्यांनी म्हटले आहे.