Chikhaldara: अहाहा! काय ती धुक्याची चादर, काय तो चिखलदरा, एकदम थंड!!
सकाळी सकाळी घनदाट धुक्याची चादर परिधान केलेलं चिखलदरा पर्यटकांना खुणावतंय. लोकं सुद्धा गाडी थांबवून निसर्गाची मजा घेताना दिसतायत. पहाटे धुक्याने आच्छादलेला निसर्गाचं अद्भुत रूप पाहायला मिळालंय.
अमरावती: मुंबईत, पुण्यात खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातच जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु झालाय. नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. नागरिकांचे हाल होत आहेत. पण अमरावतीत मात्र वेगळं चित्रं आहे. धुक्याची चादर ओढलेला चिखलदरा (Chikhaldara) अतिशय सुंदर दिसतोय. पावसानंतर चिखलदऱ्याचं सौंदर्य खुलून दिसतंय. सकाळी सकाळी घनदाट धुक्याची चादर परिधान केलेलं चिखलदरा पर्यटकांना खुणावतंय. लोकं सुद्धा गाडी थांबवून निसर्गाची मजा घेताना दिसतायत. पहाटे धुक्याने आच्छादलेला निसर्गाचं अद्भुत रूप पाहायला मिळालंय. या सुंदर दिसणाऱ्या धुक्यात गाड्या सुद्धा हेड लाईट बंद करून शांतपणे मार्गस्थ होत आहेत. पर्यटनस्थळ जास्त वाटणारं विदर्भाचं (Vidarbha) नंदनवन पावसाळ्यात अधिक सुंदर दिसतंय.