वसंत मोरे यांना रात्री संजय राऊत यांचा फोन, काय झाली दोघांत चर्चा?

| Updated on: Mar 13, 2024 | 1:38 PM

मविआतील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी वसंत मोरेंना संपर्क केल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाहीतर तर त्यांना पक्षात येण्याची ऑफरही काहींनी दिली. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर मनसे नेते वसंत मोरे यांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी फोन केला

मुंबई, १३ मार्च २०२४ : मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे दुसऱ्या दिवशीही भावनिक आणि अस्वस्थ होते. अशातच त्यांना विविध पक्षांकडून संपर्क साधला जात आहे. मविआतील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी वसंत मोरेंना संपर्क केल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाहीतर तर त्यांना पक्षात येण्याची ऑफरही काहींनी दिली. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर मनसे नेते वसंत मोरे यांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी फोन केला आहे. काल रात्रीच संजय राऊत यांनी फोन केला असल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिली. दरम्यान, संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या फोनच्या चर्चेत वसंत मोरे यांनी दोन दिवसाची वेळ मागितली आहे. दोन दिवसांची वेळ मागून घेतली, या दोन दिवसात मला पुढे काय भूमिका घ्यायची आहे. ती भूमिका मी दोन दिवसात स्पष्ट करणार असल्याचे संजय राऊत यांना फोनवर सांगितल्याचे वसंत मोरे म्हणाले.

Published on: Mar 13, 2024 01:38 PM
‘स्वाभिमान गहाण टाकला की…’, रोहित पवार यांचा शिंदे अन् अजित पवार गटाला खोचक टोला
राजीनाम्यानंतर वसंत मोरेंना राज ठाकरेंचा फोन; पण बोलणं टाळलं, कारण…