पवारांच्या राजीनाम्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचं मोठं पाऊल, तर अनेक पदाधिकाऱ्यांची NCP ला सोडचिठ्ठी
VIDEO | शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
ठाणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल आपला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त (Sharad Pawar Resigns) होत असल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या या घोषणेनंतर शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून सातत्याने पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे. मात्र शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह पक्षाला आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून राजीनाम्याचे अस्त्र काढण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा देताना म्हटले की, आपण लोकं जी भूमिका घेतो त्या सोबत राहील पाहिजे असा आग्रह शरद पवार यांचा असतो. आमचा ही तोच आग्रह आहे. शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये, जनमताचा आदर केला पाहिजे, असेही म्हणत शरद पवार यांनी निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा असे ते म्हणाले.