शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, आगामी निवडणुकीच्या रणनितीबाबत होणार चर्चा?
VIDEO | राष्ट्रवादीच्या नेत्यांची 17 मे रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक, काय होणार चर्चा?
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रीवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, याकरता विनंती केली आणि कार्यकर्त्यांसह नेत्यांच्या आग्रहास्तव शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. या राजीनामा नाट्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. 17 मे रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात ही बैठक घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याने सर्वांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात रणनिती ठरवली जाणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. तर सत्तासंघर्षाचा निकाल ११ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच या राष्ट्रवादीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याने सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. या बैठकीला शरद पवार यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेतेही हजर राहणार आहेत.