लोकसभेच्या निकालानंतर अहमदनगरचं गणित काय? 6 विधानसभांमधून कुणाकुणाची नावं चर्चेत?

| Updated on: Jun 21, 2024 | 11:36 AM

नगर लोकसभेतील मतदारसंघात सहापैकी तीन मतदारसंघात महायुतीचे तीन आणि मविआचे तीन आमदार होते. महायुतीमध्ये २ भाजप आणि एक अजित दादांच्या राष्ट्रवादीचे तर मविआमध्ये शरद पवार यांच्या तीन आमदारांचं संख्याबळ होतं. अहमदनगरच्या 6 विधानसभांमधून कुणाकुणाची नावं चर्चेत?

अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीचं नेमकं गणित काय असणार? याची चर्चा होतेय. नगर लोकसभेमध्ये राहुरी, शेवगाव, नगर शहर, पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड या विधानसभेचा समावेश आहे. नगर लोकसभेतील मतदारसंघात सहापैकी तीन मतदारसंघात महायुतीचे तीन आणि मविआचे तीन आमदार होते. महायुतीमध्ये २ भाजप आणि एक अजित दादांच्या राष्ट्रवादीचे तर मविआमध्ये शरद पवार यांच्या तीन आमदारांचं संख्याबळ होतं. राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७ मतं मिळाली. तर भाजपच्या सुजय विखेंना ५ लाख ९५ हजार ८६८ मतं मिळाली आणि तुतारी नावाने पिपाणी चिन्हावर लढलेल्या अपक्ष उमेदवाराला ४४ हजार ५९७ मतं मिळाली. यामुळे निलेश लंकेंचा विजय झाला. दरम्यान, २०१९ आणि २०२४ च्या निकालातील फरक नेमका काय सांगतो? बघा व्हिडीओ…

Published on: Jun 21, 2024 11:36 AM
‘लंगोट’वरून खेचाखेची, शिंदे गट-अजित पवार गटात शाब्दिक चकमक, एकमेकांची काढली ‘लंगोट’
Police Bharti 2024 : अमरावतीत पोलीस भरतीसाठी आलेल्या तरूणांचं आंदोलन, आक्रमक होत केली एकच मागणी?