देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावरून राष्ट्रवादीत खळबळ; लवकरच मोठा धमाका करणार, पुन्हा दिला इशारा

| Updated on: Feb 17, 2023 | 7:40 AM

VIDEO | अर्धच बोललो, लवकरच पूर्ण बोलणार... देवेंद्र फडणवीस यांनी काय दिला इशारा, बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट!

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं नाव घेत, tv9च्या कार्यक्रमात गौप्यस्फोट केला. अजित पवारांसोबत शपथविधीआधी पवारांची संमती होती, असं फडणवीस म्हणालेत. शरद पवारांनी तर हा दावा फेटाळला. त्यामुळं अजित पवार काय बोलतात याकडे नजरा होत्या. पण आपण पहाटेच्या शपथविधीवर काहीही बोलणार नाही, असं अजित पवार म्हणालेत. शरद पवारांचं नाव घेत, पहाटेच्या शपथविधीवरुन फडणवीसांनी गौप्यस्फोट केला. मात्र याहून मोठा धमाका करण्याचा इशारा फडणवीसांनी दिला आहे. तर फडणवीसांनी पवारांचं नाव घेवूनही अजित पवार बोलण्यास तयार नाही. अजित पवार बोलत नसले तरी फडणवीसांनी मात्र लवकरच पूर्ण बोलणार असल्याचं सांगून, राष्ट्रवादीच्या गोटात आणखी चलबिचल सुरु केली आहे. बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट!

Published on: Feb 17, 2023 07:40 AM
विलिनीकरण तर नाहीच, पण एसटीचे पगारही नाहीत, त्यामागचे खरे व्हिलन कोण? बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट!
कसब्यात भाजपसाठी मुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात, यासह जाणून घ्या अपडेट