मी अर्धीच गोष्ट सांगितली, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शरद पवार म्हणाले, मला आणखी…

| Updated on: Feb 17, 2023 | 1:57 PM

VIDEO | देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर स्वतः शरद पवार यांनी दिली प्रतिक्रिया, काय म्हणाले बघा?

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं नाव घेत, tv9च्या कार्यक्रमात गौप्यस्फोट केला. अजित पवारांसोबत शपथविधीआधी पवारांची संमती होती, असं फडणवीस म्हणालेत. शरद पवार यांना विचारूनच हा निर्णय झाल्याचे सांगितल्यानंतर, मी अर्धीच गोष्ट सांगितली आहे, असा सूचक इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे राजकारणात पुन्हा खळबळ उडाली होती. फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटावर स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे . देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीची अर्धीच गोष्ट सांगितल्यानंतर त्यावर शरद पवार यांना याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा, त्यावर भाष्य करून फडणवीसांचं आणखी महत्त्व वाढवावसं मला वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले. फडणवीस यांनी हा विषय इतक्या दिवसांनी का काढला हे त्यांनाच विचारण्याची गरज आहे, असे म्हणत शरद पवार यांनी खोचक टीकाही केली.

Published on: Feb 17, 2023 01:57 PM
कोणत्याही प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊ नये, शिंदे गटातील नेत्याचा राष्ट्रवादीला सल्ला
उन्हाचा पारा चढलेला त्यात चंद्रकांत पाटील यांचे ‘ते’ विधान, रोहित पवार यांचा संताप का वाढला ?