राज्यात ठिकठिकाणी सभा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं पुढचं लक्ष्य जळगाव, कुठे आणि कधी असणार सभा?
VIDEO | जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी, शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जळगावात येणार; सभेत बंडखोर आमदारांवर काय बोलणार?
मुंबई : उद्धव ठाकरे खेड, मालेगावनंतर ठाकरे गट म्हणून स्वतंत्रपणे तिसरी सभा जळगावातच घेत आहेत. उद्धव ठाकरे येत्या रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येताय. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोऱ्यात जाहीर सभा होणार आहे. राज्यात ठिकठिकाणी सभा घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंचं पुढचं लक्ष्य जळगाव आहे. जळगावच्या सभेत ते शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांसह इतर बंडखोर आमदारांवर काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.पाचोऱ्याचे माजी आमदार स्वर्गीय आर ओ पाटलांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे जळगाव दौऱ्यावर येताय. याच दौऱ्यात त्यांच्या जाहीर सभेचं नियोजन ठाकरे गटाने केलंय. पाचोरा शहरातील भडगाव रस्त्यावर त्यांची सभा होईल. या सभेची जय्यत तयारी जोरात सुरू आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जळगावात येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह आहे.