उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर रामदास कदम यांची सभा; तेच मैदान, तीच वेळ अन् तारीखही सांगितली
VIDEO | उद्धव ठाकरे यांना व्याजासकट उत्तर देणारासाठी रामदास कदम यांनी नेमकी काय केली गर्जना?
रत्नागिरी : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज खेडमध्ये सभा आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्हं शिंदे गटाला गेल्यानंतरची उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा असल्याने ते नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, शिवसेना नेते रामदास कदम यांनीही त्याच मैदानावरून उद्धव ठाकरे यांना जशास तसं उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे येतील, भाषण करतील आणि निघून जातील. पण त्या सभेला इथले स्थानिक किती असणार? दोन चार टक्के तरी आहे का? म्हणून मला त्याची काळजी नाही. त्यांनी यावं, बोलावं, जावं. आम्हाला त्याची काही फिकीर नाही. आम्ही त्यांची नोंदही घेत नाही. पण या सर्वांना उत्तर त्याच ठिकाणी त्याच मैदानावर 19 मार्चला दिलं जाणार आहे, असे म्हणत रामदास कदम यांनी गर्जना केली.
Published on: Mar 05, 2023 03:51 PM