एकीकडे अवकाळी पावसाचं थैमान; मात्र ‘या’ जिल्ह्यात उन्हाचा तडाखा, रस्ते सुनसान
VIDEO | अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर 'या' जिल्ह्यात 40.00 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद
भंडारा : भंडारा जिल्ह्यात वादळ आणि अवकाळी पावसानंतर उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर जिल्ह्यात 40.00 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे. या उन्हाची झळ सामान्य माणसांना बसू लागली आहे. मार्च महिना लोटल्यानंतरही भंडाऱ्यात उन्हाळा सुरू झालेला नव्हता. ठराविक अंतराने येणारी वादळे, अवकाळी पाऊस यामुळे तापमान हे 32 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. मात्र आज अचानक या तापमानात वाढ होऊन 40.00 अंश सेल्सिअस असे उच्चांकी तापमान झाले आहे. या उष्णतेपासून नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्यासाठी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. शहराच्या विविध भागात शुकशुकाट दिसू लागला असून रस्तेही ओस पडले आहेत. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने घराबाहेर पडणं सहसा नागरिक टाळताना दिसताय.
Published on: Apr 13, 2023 05:36 PM