आता मोबाईलसारखं वीजेच्या मीटरचंही करावं लागणार रिचार्ज, नेमकं काय आहे स्मार्ट मीटर?

| Updated on: Jun 14, 2024 | 12:40 PM

वीजेचं स्मार्ट मीटर हे मोबाईलच्या रिचार्जसारखं आहे. प्रिपेड स्मार्ट मीटर लावल्यावर रिचार्ज करावं लागेल त्यानंतर वीज सुरू होईल. रिचार्ज संपलं की घरात वीज बंद होईल. रिचार्ज संपण्याच्या २ दिवसांपूर्वी मोबाईलवर तसा मेसेजही येईल. म्हणजेच रिडींग घेऊन बिलं देण्याची पद्धत बंद होईल.

आता तुम्हाला मोबाईल फोनप्रमाणे वीजेच्या मीटरचं रिचार्ज करावं लागणार आहे. त्यासाठी स्मार्ट मीटर लावण्यास सुरूवात झाली. मात्र ऊर्जामंत्री असणाऱ्या फडणवीस यांच्या नागपुरातून आणि विदर्भातून स्मार्ट मीटर विरोधात जोरदार विरोध सुरू आहे. या आंदोलनावेळी पुतळे जाळण्यात आलेत. तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू असा इशाराही नागरिकांनी दिला. वीजेचं स्मार्ट मीटर नेमकं काय? वीजेचं स्मार्ट मीटर हे मोबाईलच्या रिचार्जसारखं आहे. प्रिपेड स्मार्ट मीटर लावल्यावर रिचार्ज करावं लागेल त्यानंतर वीज सुरू होईल. रिचार्ज संपलं की घरात वीज बंद होईल. रिचार्ज संपण्याच्या २ दिवसांपूर्वी मोबाईलवर तसा मेसेजही येईल. म्हणजेच रिडींग घेऊन बिलं देण्याची पद्धत बंद होईल. एका महिन्यात बिल भरलं नाहीतर पुढच्या महिन्यात दोन्ही महिन्यांचं बिल भरण्याची पद्धतच बंद होईल. म्हणूनच वीजेच्या स्मार्ट मीटरला विरोध होत असल्याचे दिसतंय.

Published on: Jun 14, 2024 12:40 PM
नरेंद्र मोदी विरोधामुळं ‘मविआ’ला मतदान, राज ठाकरे यांना नेमकं म्हणायचं तरी काय?
Vidarbha Rain Forecast : महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट तर विदर्भात पुढील 5 दिवस…