पुण्यात पुरुष मंडळींचं अनोखं आंदोलन, एलॉन मस्क यांची पूजा करत केली ‘ही’ मागणी
VIDEO | आंदोलनकर्त्या पुरुषांकडून ट्विटरचे सर्वासर्वा Elon Musk यांची पूजा आणि आरती, काय आहे कारण?
पुणे : पुणे शहरात पुरुष मंडळींचं अनोखं आंदोलन पाहायला मिळाले. स्त्री पुरूष समान कायदा करा, अशी आंदोलक पुरूषांची मागणी आहे. स्त्रियांसारखा समान कायदा आम्हालाही द्या या मागणीसाठी पुण्यात पुरुष मंडळी आंदोलनाला बसले आहे. अनेक कायदे हे फक्त महिलांच्या बाजूने पुरुषांचा देखील विचार व्हावा आंदोलन करणाऱ्या पुरुषांची मागणी असून यासंबंधित आंदोलक पुरुष थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या वैवाहिक बलात्कार विरोधात पुरुषांच्या हक्कासाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्या पुरुषांकडून ट्विटरचे सर्वासर्वा Elon Musk यांची पूजा आणि आरती देखील करण्यात आल्याचे या आंदोलनस्थळी पाहायला मिळाले आहे.
Published on: Mar 25, 2023 10:29 PM