Maratha Reservation Protest | जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, काय घडला प्रकार?

| Updated on: Sep 01, 2023 | 8:44 PM

VIDEO | मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून जबर लाठीचार्ज, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात नेमका काय घडला प्रकार?

Follow us on

जालना, १ सप्टेंबर २०२३ | जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून मोठा लाठीचार्ज करण्यात आला आहे. पोलिसांकडून असा आरोप होतोय की, आंदोलकांकडून दगडफेक झाली. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु होतं. आरक्षण थेट जाहीर करावं, अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते. पण पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकारानंतर जालन्यात लाठीचार्जच्या घटनेमुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ केली आहे. आंदोलकांनी काही वाहनांना जाळून टाकलं. तसेच महामार्गावर दगडफेक करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.