‘त्या’ आरोपांनंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

| Updated on: Jun 12, 2023 | 3:28 PM

VIDEO | खंडणी प्रकरणावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यात कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. आता हा प्रकार चांगलाच वादात सापडला आहे. या पथकात कृषिमंत्र्यांचे स्वीय सहायक यांच्यासह काही खासगी व्यक्ती असल्याचा देखील आरोप होत आहे. धाडी टाकणाऱ्या या पथकामध्ये असलेले दिपक गवळी हे अब्दूल सत्तार यांचे स्विय सहायक असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र सत्तारांनी हा आरोप फेटाळला. यानंतर दिपक गवळी नेमके कोण? असा सवाल विचारण्यात येत असताना अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले आहे. दिपक गवळी कृषी अधिकारी आहे आणि तो त्याचा या युनिटमध्ये समावेश आहे. ६२ अधिकाऱ्यांनी कारवाई केली. ५० वर्षांमधील ही पहिली कारवाई आहे. आतापर्यंत २६९ कारवाया झाल्या आहेत. या कारवाईमध्ये ६२ लोक संपूर्ण महाराष्ट्रातून नेमले होते, यापैकी दिपक गवळी देखील एक होते, असे सत्तार म्हणाले.

Published on: Jun 12, 2023 03:28 PM
“भागवत कराड, संदीपान भुमरे यांच्या सगळ्या कुंडल्या वेळेवर बाहेर काढणार”, ठाकरे गटाचा इशारा
Biparjoy Cyclone |गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यास जाताय? थोडं थांबा कारण…