कृषीमंत्री धनंजय मुंडे प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक; शेतकऱ्यासाठी घातलं साकडं, म्हणाले…
VIDEO | श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलं प्रभू वैद्यनाथाचं दर्शन आणि नतमस्तक होत राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे, असं साकडं देखील घातलं.
परळी, २१ ऑगस्ट २०२३ | कृषी मंत्री धनंजय मुंडे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक झाले आहेत. आज त्यांनी श्रावण सोमवारनिमित्त प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी राज्यात वरून राजा बरसू दे आणि शेतकऱ्यांवर निर्माण झालेला आसमानी संकट दूर होऊ दे, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे…असं साकडं वैद्यनाथाच्या चरणी मुंडेंनी घातलं आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं. उद्याच दिल्लीमध्ये जाऊन कांदा निर्यातीवरील जो कर आहे, तो कमी करण्यासाठी वाणिज्य मंत्र्यांसह केंद्रीय कृषिमंत्र्यासोबत चर्चा करून निर्णय घेऊ. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन वगैरे करू नये, सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असं आवाहन आणि माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे..
Published on: Aug 21, 2023 05:02 PM