‘त्यांनी देशाचं पंतपप्रधान व्हावं’, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज? सरकारमधील मंत्र्यांच्या छगन भुजबळांना टोला
भुजबळांना डावलून माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद दिल्याची चर्चा आहे. यावर माणिकराव कोकाटे म्हणाले, याच्या अगोदरही आम्हाला सामुदायिक बळ मिळायचे. मला वेगळं बळ काय देणार, माझ्यात तेवढी ताकद आहे. आमदार होतो तेव्हा पण आणि आता मंत्री आहे चिंता करण्याची गरज नाही
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून मंत्री छगन भुजबळांना डावलण्यात आल्याने ते नाराज आहेत अशी चर्चा आहे. यावर नुकत्याच मंत्रिमंडळात कृषी मंत्री झालेल्या माणिकराव कोकाटे यांनी भाष्य केले आहे. ‘प्रत्येक माणसाला मंत्रिमंडळमध्ये समावेश करणे शक्य नाही. मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संख्या मर्यादित आहे. काहींना मागे संधी मिळाली, तर काहींना आता मिळाली. एकच व्यक्तीला सारखी संधी मिळेल तर बाकीच्यांना कधी मिळणार. अनेक आमदार राहिले निघून गेले दुसऱ्यांनाही संधी मिळाली पाहिजे हा ही विचार केला पाहिजे’, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय. तर भुजबळ तो विचार करतील असं मला वाटतं, असंही माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं. तर भुजबळांना डावलून माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद दिल्याची चर्चा आहे. यावर ते म्हणाले, याच्या अगोदरही आम्हाला सामुदायिक बळ मिळायचे. मला वेगळं बळ काय देणार, माझ्यात तेवढी ताकद आहे. आमदार होतो तेव्हा पण आणि आता मंत्री आहे चिंता करण्याची गरज नाही. पुढे ते असेही म्हणाले, दादांचा वादा पक्का आहे. ते कमिटेड पॉलिटिशन आहेत. एखादी गोष्ट करताना दादा मागेपुढे बघत नाही आमचे सिन्नरकर दादांवरती प्रचंड खुश असल्याचे म्हटले. तर छगन भुजबळांनी दादांचा वादा फोल ठरल्याचे म्हटले होते. यावर कोकोटे म्हणाले, छगन भुजबळ यांना कोणी वादा केला होता. कुठे पळून चालले, राज्यसभा आहे अजून आत्ताशी चार दिवस झाले सरकार स्थापन होऊन…जरासा दम काढला पाहिजे भुजबळांनी देशाचा पंतप्रधान व्हावं असं मला वाटतं, असं म्हणत त्यांनी टोलाही लगावला.