BMCसाठी भाजप आशिष शेलांरांकडे जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत? राजकीय घडामोडींना वेग!
शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनीही आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी कंबर कसायला सुरुवात केली आहे. अशातच आता भाजप आशिष शेलाराकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी बीएमसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोपवणार असल्याचं कळतंय.
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. एकीकडे वरळी रविवारी आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वेगवेगळ्या प्रकल्पांच्या शुभारंभाचा धडाका लावलेला असतानाचा आता भाजपच्या वर्तुळातूनही एक महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. भाजपकडून बीएमसीच्या निवडणुकीसाठी आशीष शेलार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनीही आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी कंबर कसायला सुरुवात केली आहे. अशातच आता भाजप आशिष शेलाराकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी बीएमसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोपवणार असल्याचं कळतंय. एककीडे भाजप मनसेसोबत युती करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलेलं आहे. अशातच भाजपच्या पालिका निवडणुकांच्या अनुशंगानंही तयारी करण्यास सुरुवात केल्याचं कळतंय.