नाशिक पदवीधर निवडणुकीच्या विजयानंतर सत्यजित तांबे यांची मुलगी म्हणते, माझे बाबा फार…
नाशिक पदवीधर निवडणुकीच्या विजयानंतर सत्यजित तांबे यांची मुलगी अहिल्या तांबे हिची प्रतिक्रिया, म्हणाली माझे बाबा फार हार्डवर्कर आहेत आणि...
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. यामध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय झाला. या विजयावर सत्यजित तांबे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या फेरीतच मोठं यश मिळालं असून सोमवारी वर्किंग डे असल्याने लोकं मतदानाला येऊ शकले नाही, मतदान यादीतील गोंधळ या पार्श्वभूमीवर अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाले, पण मिळालेल्या यशात समाधानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तांबे या कुटुंबाने राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतं केले आहे. त्यामुळे सगळ्या पक्षाकडून नेहमीच सहकार्य होत असते. पुढील भूमिका ४ फेब्रुवारी रोजी स्पष्ट करणार आहे. जुन्या पेन्शनचा प्रश्न, युविकांना रोजगार देणं, युविकांना प्रतिनिधी म्हणून चौकटीच्या बाहेर जाऊन काम करणार असून येणाऱ्या काळात ही प्राथमिकता असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सत्यजित तांबे यांची मुलगी अहिल्या तांबे हिने देखील वडिलांच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाले माझे बाबा खूप हार्डवर्कर आहेत, आणि माझे बाबाच माझ्यासाठी सुपरहिरो असल्याचे तिने म्हटले आहे.