बळीराजाची कमाल, वर्षाला ‘इतक्या’ लाखांची कमाई थेट बंगल्यावरच साकारलं डाळिंबांचं झाडं
साडे तीन एकर डाळींब शेतातून त्यांना वर्षाला 60 लाख रुपये उत्पन्न मिळालं. त्यामुळे त्यांचं बंगल्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्यातून त्यांनी 30 लाखांचा बंगला आपल्या शेतात बांधला. डाळींब पिकामुळे हे शक्य झाल्याने त्याची आठवण म्हणून थेट बंगल्यावरचं डाळिंबाच्या झाडाची प्रतिकृती त्यांनी साकारली आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील हांगेवाडी गावचे शेतकरी संतोष विश्वनाथ रायकर यांनी कमालच केली आहे. त्यांनी आपल्याला नवीन बंगल्यावर चक्क डाळिंबाच्या झाडाची प्रतिकृती साकारली आहे. त्यासाठी त्यांना एक लाख रुपये खर्च आला आहे. रायकर हे पूर्वी पारंपारिक पिकातून उत्पन्न घेत होते. मात्र त्यातून त्यांना पुरेसा नफा मिळत नव्हता. त्यानंतर त्यांनी डाळींब पीक घेण्यास सुरवात केली. सुरुवातीला एक एकर क्षेत्रात त्यांनी डाळिंबाचं पीक घेतलं त्यातून चांगलं उत्पन्न मिळाल्याने अर्धा एकरमध्ये शेततळे घेऊन साडे तीन एकरमध्ये डाळींब शेती त्यांनी केली. त्यातून त्यांना वर्षाकाठी 60 लाखांचं उत्पन्न मिळालं. त्यामुळे डाळिंबाच्या पिकाची आठवण म्हणून त्यांनी आपल्या नवीन बंगल्यावर डाळिंबाच्या पिकाची प्रतिकृती साकारली आहे. बघा यशस्वी शेतकऱ्याच्या बंगल्याचं अनोख रूप…
Published on: Aug 12, 2024 04:42 PM