खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानभवनात निलेश लंकेंनी केली ‘ही’ कृती, होतेय सर्वत्र चर्चा
विधानभवनात दाखल झाल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी जे केलं त्याची सध्या चर्चा सुरू आहे. निलेश लंके हे विधानभवनात पोहोचताच त्यांनी वाकून विधानभवनाच्या पायऱ्यांना नमस्कार केला. निलेश लंके यांनी केलेली हीच कृती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बघा व्हिडीओ
खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच निलेश लंके हे विधानभवनात दाखल झाले होते. विधानभवनात दाखल झाल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी जे केलं त्याची सध्या चर्चा सुरू आहे. निलेश लंके हे विधानभवनात पोहोचताच त्यांनी वाकून विधानभवनाच्या पायऱ्यांना नमस्कार केला. निलेश लंके यांनी केलेली हीच कृती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर गेल्या महिन्यातच 18 व्या लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीत लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. लोकसभेत इंग्रजीतून शपथ घेत निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांच्या आव्हानाला संसदेतून उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले होते. सुजय विखे संसदेत इंग्रजीत भाषण करतानाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला होता. तेव्हा समोरच्या उमेदवाराने एक महिना पाठांतर करून तरी असं इंग्रजी बोलून दाखवलं तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं सुजय विखे म्हणाले होते. याच आव्हानाला निलेश लंके यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिलं होतं.