Ahmednagar | पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंनी सोडलं मौन
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी अखेर सोडलं मैना सोडलं आहे. तीन दिवसांनी माध्यमांसमोर येऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली. ती ऑडिओ क्लिप चुकीने व्हायरल झाली असून, हे मानसिक उद्विघ्नेतून लिखाण केले आणि नंतर त्याची ऑडिओ क्लिप तयार केली. मात्र ऑडिओ क्लिप चुकून भावाच्या मित्राकडून व्हायरल केल्याचा दावा ज्योती देवरे यांनी केला. ऑडिओ क्लिप चुकून भावाच्या मित्राकडून व्हायरल झाल्यामुळे जास्त डिप्रेशन आलं आणि 2 दिवस फोन बंद ठेवला, असं ज्योती देवरे यांनी सांगितलं.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी अखेर सोडलं मैना सोडलं आहे. तीन दिवसांनी माध्यमांसमोर येऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली. ती ऑडिओ क्लिप चुकीने व्हायरल झाली असून, हे मानसिक उद्विघ्नेतून लिखाण केले आणि नंतर त्याची ऑडिओ क्लिप तयार केली. मात्र ऑडिओ क्लिप चुकून भावाच्या मित्राकडून व्हायरल केल्याचा दावा ज्योती देवरे यांनी केला. ऑडिओ क्लिप चुकून भावाच्या मित्राकडून व्हायरल झाल्यामुळे जास्त डिप्रेशन आलं आणि 2 दिवस फोन बंद ठेवला, असं ज्योती देवरे यांनी सांगितलं. मात्र आता जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलणं झालं असून मी पूर्णपणे स्टेबल असल्याचं ज्योती देवरे यांनी म्हटलं.
ज्योती देवरे यांची सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, आता याच तहसीलदार देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेत. याबाबतचा चौकशी अहवाल अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी उपविभागीय आयुक्तांकडे सादर केलाय. या अहवालात महिला तहसीलदार देवरे यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आलाय.