Ahmednagar | किरकोळ कारणातून झालेल्या वादातून दगडफेक, वाहनांची तोडफोड, अहमदनगरमधील घटना
अहमदनगर शहरातील पीरशहा खुंट येथे दोन गटात भांडण होऊन दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. सलूनच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ कारणातून वाद झाला होता. या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले.
अहमदनगर शहरातील पीरशहा खुंट येथे दोन गटात भांडण होऊन दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. सलूनच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ कारणातून वाद झाला होता. या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले. तर, यावेळी जमावाने वाहनांची तोडफोड केली आहे. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दगडफेक झालेल्या ठिकाणावर मोठा पोलिस बंदोबस्त तौनात करण्यात आला आहे. तर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.