राज ठाकरेंवर बोलू नका; असदुद्दीन ओवेसींनी काढला फतवा
राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कात (Shivaji park) मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांवरती सडकून टीका केली.
राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कात (Shivaji park) मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांवरती सडकून टीका केली. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे उतरावे लागतील, त्याचबरोबर माझा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही. ज्या मशिदीच्या (Masjid) बाहेर भोंगे लागलेले असतील. त्या मशिदी समोर भोंग्यांच्या समोर दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा लावा असं काल राज ठाकरेंनी त्यांनी वक्तव्य केलं होतं. काल झालेल्या राज ठाकरेंच्या भाषणावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील टीका केली आहे. राज ठाकरेंवर बोलू नका असदुद्दीन ओवेसीनी (Asaduddin Owaisi) फतवा काढला आहे. एमआयएम कार्यकर्त्यांना कोणत्याही गोष्टीवर बोलायचं नाही ठणकावून सांगण्यात आलं आहे.