जरांगेला एक फोन आला अन् त्यानं भूमिका बदलली, कुणी केली पोलखोल?
'जरांगे यांना अक्कल नाही. लोकांची ते फसवणूक करत आहेत. ते हेकेखोर शातीर आहेत, कोणत्याही शब्दावर अडून राहातो. सर्व प्रक्रियेत मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हे मनोज जरांगे याला माहिती नाही,'मनोज जरांगे यांचा जिवलग मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर यांचा हल्लाबोल
मुंबई | 21 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे यांचा जिवलग मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जरांगे यांना अक्कल नाही. लोकांची ते फसवणूक करत आहेत. ते हेकेखोर शातीर आहेत, कोणत्याही शब्दावर अडून राहातो. सर्व प्रक्रियेत मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हे मनोज जरांगे याला माहिती नाही, असे म्हणत अजय महाराज बरासकर यांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय. तर १० फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यासाठी समाजाची बैठक घेतली नाही? त्यावेळी लोकांनी विरोध केला. १६ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. परंतु एक फोन आला आणि जरांगे यांनी भूमिका बदलली. समाज अंतरवालीत गेला नाही. लोक आले नाहीत, त्यामुळे जरांगे संतापले होते. लोक जमा करता येत नाही, मी उपोषण कसे करु, असे जरांगे बोलल्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, असे म्हणत अजय महाराज बरासकर यांनी जरांगेंची पोलखोलच केली.