मराठा आरक्षणासंदर्भात किती अन् कुठं गुप्त बैठका? अजय बारसकर यांनी जरांगे पाटलांना पाडलं उघडं

| Updated on: Feb 21, 2024 | 6:00 PM

मनोज जरांगे पाटील यांचा अत्यंत जवळचा मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मुंबईत पत्रकार परिषद घेत अजय महाराज बरासकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची पोलखोलच केली

मुंबई | 21 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांचा अत्यंत जवळचा मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मुंबईत पत्रकार परिषद घेत अजय महाराज बरासकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची पोलखोलच केली आहे. ते म्हणाले, ’23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहीं जणांसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजन गाव गणपती इथं उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मिटिंग केली आहे. लोणावळा, वाशीमध्ये ही समाजाला वगळून मिटिंग केली. वाशी आंदोलन इथवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो. मात्र त्यांचा मिटिंगमुळे मला आक्षेप होता.’ तर पहिली गुप्त मिटींग बीडला कन्हैया हॉटेलमध्ये झाली. त्याची माहिती उपलब्ध आहे. दुसरी गुप्त मिटींग रांजणगावला पहाटे 4 वाजता झाली. तिसरी गुप्त मिटींग पुण्यातील औंध परिसरात झाली. त्यानंतर लोणावळ्याला झाली. पाचवी मिटींग वाशीला झाली आहे, अशी माहिती अजय महाराज बरासकर यांनी पत्रकार परिषदेत देत मनोज जरांगे पाटील यांना उघडंच पाडलं.

Published on: Feb 21, 2024 06:00 PM
जरांगेंनी थोडा संयम ठेवावा, ती मागणीही पूर्ण होणार; दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
मराठ्यांचं वाटोळं करायच्या नादात पडू नका… जरांगे पाटलाचं बारसकरांच्या ‘त्या’ आरोपांना उत्तर