Breaking | पुण्यात सारथीसंदर्भात अजित पवार, छत्रपती संभाजीराजे यांच्यांत संध्याकाळी 7 वाजता बैठक
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यामध्ये पुणे येथे सारथी संस्थेसंदर्भात बैठक होणार आहे.
पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यामध्ये पुणे येथे सारथी संस्थेसंदर्भात बैठक होणार आहे. सांयकाळी 7 वाजता दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांनी राज्य सरकारकडे सहा ते सात मागण्या मांडल्या होत्या. यामध्ये पुणे येथील सारथी संस्थेचा प्रश्न होता. सारथी संस्थेला निधी देणे. तारादूत प्रकल्पाबाबत देखील आज चर्चा होण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत काय निर्णय होतो ते पाहावे लागणार आहे.