ताई-दादांमधला दुरावा कायम, आज पुन्हा एकाच मंचावर पण बोलणं टाळलं; यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

| Updated on: Mar 10, 2024 | 2:07 PM

पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर.... पुण्यातील रुग्णालयाच्या भूमीपूजनाच्या सोहळ्यानिमित्त ते दोघेही एकाच मंचावर होते. यावेळी त्यांनी भाषणात एकमेकांची नावं घेतली पण त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलंय.

मुंबई, १० मार्च २०२४ : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील दुरावा आजही कायम असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर असताना त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं आहे. पुण्यातील रुग्णालयाच्या भूमीपूजनाच्या सोहळ्यानिमित्त ते दोघेही एकाच मंचावर होते. यावेळी त्यांनी भाषणात एकमेकांची नावं घेतली पण त्यांनी एकमेकांशी बोलणं मात्र टाळल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, ३ मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने पवार कुटुंब बारामतीमध्ये एकाच मंचावर होते. मात्र सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांशी बोलणं काय पाहणं सुद्धा टाळलं होतं. यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या दुरावा फक्त बारामतीकरांनी अनुभवला असं नाही. तर मिडीयाच्या माध्यमातून ताई-दादाचा हा दुरावा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता. दरम्यान, आजच्या कार्यक्रमातील अबोल्यावर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Mar 10, 2024 02:07 PM
सदाभाऊ खोत भावी खासदार! ‘त्या’ पोस्टरबाजीवर म्हणाले, लडेंगे और….
साहेब काही जरी झालं तरी… मुलाचं भाषण ऐकत असताना भास्कर जाधवांच्या डोळ्यात अश्रू तरळले