नानांची भूमिका मविआला सुरुंग लावणारी, अजित पवारांचा संताप, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

| Updated on: Jul 12, 2021 | 4:42 PM

 नाना पटोलेंची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे, अशा शब्दात अजित पवारांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे व्यक्त केली, अशी सूत्रांची माहिती आहे.

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले आहेत. नाना पटोलेंची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे, अशा शब्दात अजित पवारांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे व्यक्त केली. नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर केला होता. त्यानंतर अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती टीव्ही 9 मराठीला दिली.

अजित पवारांची नाराजी 

महाविकास आघाडीला सुरुंग लावला जातोय, असं अजित पवार म्हणाले. नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नाना पटोलेंची भूमिका मविआला कमकुवत करण्याची आहे. मविआला अडचणीत आणणारी आहे, असं अजित पवारांचं म्हणणं आहे.

Published on: Jul 12, 2021 04:41 PM
भाजप नेत्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे, सहकार खात्यावरुन राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
बैल 60 फूट खोल विहिरीत पडला, अखेर क्रेन बोलावली, तब्बल तीन तासानंतर बाहेर काढण्यात यश