मी आज पहिल्यांदा… राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवारांनी जाहीर केला पहिला उमेदवार

| Updated on: Mar 26, 2024 | 3:18 PM

पक्षाच्या आमदार आणि खासदारांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एकत्रित बैठक घेतली. जवळपास 99 टक्के काम पूर्ण केलेलं आहे. फक्त आमचं ठरलं आहे की, 28 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे बसून मुंबईला पत्रकार परिषद घेऊ, असे म्हटले.

पक्षाच्या आमदार आणि खासदारांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एकत्रित बैठक घेतली. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पहिला उमेदवार जाहीर केला. जवळपास 99 टक्के काम पूर्ण केलेलं आहे. फक्त आमचं ठरलं आहे की, 28 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे बसून मुंबईला पत्रकार परिषद घेऊ, असे अजित पवार यांनी म्हटले तर मी आज पहिल्यांदा रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवार जाहीर करतो. सुनील तटकरे तिथे महायुतीचे उमेदवार असतील. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष, तसेच रामदास आठवले, कवाडे, सदाशिव खोत, रासपचे महादेव जानकर, विनायक गोरे, सचिन असे सगळे सहकारी मिळून आम्ही महाराष्ट्रातील 48 जागा लढवत आहोत, अशी माहिती दिली. काहींनी फॉर्म भरले आहेत. विदर्भात पहिल्या टप्प्यात निवडणुका आहेत. इतर जागांबाबत 28 तारखेला माहिती देईन, असे अजित पवार म्हणाले.

Published on: Mar 26, 2024 03:18 PM
देशात आणि राज्यात ईदी अमिनचे राज्य हुकूमशाही सुरू, संजय राऊतांचा घणाघात
नवी झेप घेण्यासाठी सज्ज…आढळराव पाटील अजित पवार गटात, FB पेजवर राष्ट्रवादीचा उल्लेख