‘..तेव्हा गमंत केली आता नको, नाहीतर बारामतीला वाली नाही’, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
लोकसभेला तुम्ही गंमत केली आता विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर लोकसभेसारखं झालं तर बारामतीला कोणी वालीच राहणार नाही, असं अजित पवार म्हणालेत. यावर शरद पवार म्हणाले, उद्या मीच देशाचा प्रमुख आहे असं म्हणतील अशी बोचरी टीका अजित पवारांवर केली.
बारामतीवरून अजित पवारांनी मतदारांना आपल्या स्टाईलने विनंतीवजा इशाराच दिला. लोकसभेला तुम्ही गंमत केली आता विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर लोकसभेसारखं झालं तर बारामतीला कोणी वालीच राहणार नाही, असं अजित पवार म्हणालेत. यावर शरद पवार म्हणाले, उद्या मीच देशाचा प्रमुख आहे असं म्हणतील अशी बोचरी टीका अजित पवारांवर केली. यापूर्वी देखील अजित पवार यांनी शरद पवार यांच्यानंतर बारामतीचं मलाच बघायचं आहे, असं वक्तव्य केलं होतं. आता अजित पवारांनी मतदारांना असं म्हटलं की, विधानसभेत वेगळा विचार केला तर बारामतीला कोणी वालीच राहणार नाही, असा शब्दप्रयोग आहे. यावर सुप्रिया सुळेंनी पलटवार केलाय. ‘कोणाच्या नंतर मीच अशी भाषा माझ्या संस्कृतीत बसत नाही.’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीला अजित पवारांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नातू युगेंद्र पवार मैदानात आहे. त्यावरून अजित पवार यांनी शरद पवारांच्या पत्नी आणि काकी प्रतिभा पवार यांच्यावरही मोर्चा वळवला. माझ्या निवडणुकीत कधी काकी आल्या नाहीत पण आता नातवाचा पुळका आल्याचे अजित पवार म्हणाले.