Ajit Pawar at Sangli | अजित पवार सांगलीत दाखल, अधिकाऱ्यांकडून पूरस्थितीची माहिती
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगली येथील परिस्थिती पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत.
गेले काही दिवस राज्यातील बऱ्याच भागात विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पूराचे पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगली येथील पूरस्थिती पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पोहचले आहेत. मुख्यमंत्री देखील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले होते. पण साताऱ्याजवळ हवामान खराब झाल्याने त्यांचे हेलिकॉप्टर पुढे जाऊ शकले नाही. ज्यामुळे ते पुन्हा पुण्यासा परतले.