Maharashtra Budget 2024 : ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?

| Updated on: Jun 28, 2024 | 5:02 PM

सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग केंद्रांना दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल-डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा सुधारित कर अंदाज ३,२६,३९७ कोटी आहे. या आर्थिक वर्षाच्या महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दीष्ट ३,४३,०४० कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले असल्याचे अजित पवार म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रात डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे वरुन २५ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे महाराष्ट्राती मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे ६५ पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे २ रुपये ७ पैसे प्रति लिटर स्वस्त होणार असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, “२०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा सुधारित कर अंदाज ३,२६,३९७ कोटी आहे. या आर्थिक वर्षाच्या महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दीष्ट ३,४३,०४० कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग केंद्रांना दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल-डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे”, असं अजित पवार म्हणाले.

Published on: Jun 28, 2024 05:02 PM
budget 2024 : तुम्ही 21 ते 60 वर्षाच्या आहात? मग दरमहिन्याला 1500 रुपये घेऊन जा, काय आहे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना?
Maharashtra Budget 2024 : ‘जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने’, माजी अर्थमंत्र्यांकडून महायुती सरकारच्या बजेटची चिरफाड