सत्तेत सहभागी होण्यापूर्वी अमित शाहांकडे कोणत्या खात्याची मागणी? अजितदादांचा मोठा खुलासा

| Updated on: Dec 12, 2023 | 3:28 PM

भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यापूर्वी आपल्याला अर्थखात्याची जबाबदारी हवी, असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांना सांगितल्याचे अजित पवार यांनी म्हटले. तर अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलत असताना गौप्यस्फोट केले. तर शरद पवारांसंदर्भात विचारणा करण्यात आली असता...

मुंबई, १२ डिसेंबर २०२३ : भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यापूर्वी आपल्याला अर्थखात्याची जबाबदारी हवी, असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांना सांगितल्याचे अजित पवार यांनी म्हटले. तर अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलत असताना गौप्यस्फोट केले. तर शरद पवारांसंदर्भात विचारणा करण्यात आली असता शरद पवार यांना आरामाची गरज आहे, मात्र ते ऐकत नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले. सत्तेत सहभागी होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघे वरीष्ठ नेते सत्तेत आधीपासून सहभागी होते. तर अर्थखातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असेल असा सूर भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचा होता. परंतु आग्रहामुळे अर्थ खाते अजित पवार यांना देण्यात आले. हे सांगताना अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री असल्याने प्रोटोकॉलनुसार ते वरिष्ठ असल्याने सुरुवातीला फाईल माझ्याकडे येईल त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल आणि मगच मुख्यमंत्र्यांकडे जाईल असा निर्णय झाला. तशी माझीच भुमिका असल्याचे अजित पवार म्हणाले.

Published on: Dec 12, 2023 03:28 PM
गलती से मिस्टेक… संजय राऊत चुकीनं प्रसाद लाड यांच्या कारमध्ये बसले अन्…, व्हिडीओ होतोय व्हायरल
Old Pension : सरकारी कर्मचारी आक्रमक, 14 डिसेंबरपासून जाणार संपावर, काय आहे नेमकी मागणी?