देवेंद्र फडणवीस यांचं अर्थ खातं कसं मिळवलं?; अजितदादा यांचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Dec 13, 2023 | 11:21 AM

राज्याच्या अर्थखात्याची तिजोरी दादांकडे पण चावी फडणवीस यांच्या हाती? तर देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व मान्य केल्यानंतर अर्थखातं मिळालं, असे म्हणत अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीस यांना स्वतःकडेच ठेवायचं होतं अर्थखांतं मात्र एका अटीनं ते अजित पवार यांच्याकडे गेलं.

मुंबई, १३ डिसेंबर २०२३ : अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत जाऊन अर्थमंत्री कसे झालेत? याबाबत भाष्य करत अजित पवार यांनी स्वतः गौप्यस्फोट केलेत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, अर्थमंत्री अजित पवार म्हणून राज्याच्या तिजोरीच्या खातं असलं तरी मात्र त्या तिजोरीच्या चाव्या मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. राज्याच्या अर्थखात्याची तिजोरी दादांकडे पण चावी फडणवीस यांच्या हाती? तर देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व मान्य केल्यानंतर अर्थखातं मिळालं, असे म्हणत अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीस यांना स्वतःकडेच ठेवायचं होतं अर्थखांतं मात्र एका अटीनं ते अजित पवार यांच्याकडे गेलं. अजित पवार यांना अर्थखातं कसं मिळालं याबाबत बोलत असताना अनौपचारिक गप्पांमधून मोठे गौप्यस्फोट त्यांनी केले. जेव्हा अजित पवार सत्तेत गेले तेव्हापासून ते फडणवीस यांचं अर्थखातं घेणार याची चर्चा होती. बघा कसं मिळवलं अजितदादांनी अर्थखातं…

Published on: Dec 13, 2023 11:20 AM