पुतणे, पवार अन् पॉलिटिक्स, कोण आहेत युगेंद्र पवार? ज्यांनी शरद पवारांना दिला पाठिंबा
काका शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड पुकारून ते सत्तेत सहभागी झालेत आणि आता अजित पवार यांच्या सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार म्हणजेच आजोबांसोबत राहणं पसंत केलंय
मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : शरद पवार यांचे सख्खे पुतणे सत्तेत गेले तर दुसरीकडे अजित पवार यांचे सख्खे पुतणे हे शरद पवार यांच्याकडे आलेत. काका शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड पुकारून ते सत्तेत सहभागी झालेत आणि आता अजित पवार यांच्या सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार म्हणजेच आजोबांसोबत राहणं पसंत केलंय. माझ्या कुटुंबातील लोक माझ्या विरोधात असतील, असं वक्तव्य अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यानुसारच अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवारांनी आम्ही शरद पवार यांच्या बाजून असल्याचे स्पष्ट केले. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार आहेत. अजित पवार म्हणाले होते की, कुटुंबात त्यांना एकट पाडलं जाईल. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, मला असं वाटत नाही. कुटुंब फुटलंय, अजितदादांना एकट पाडलं जातय असं नाही, कुटुंब एकच आहे. कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे. कुटुंबात मी छोटा माणूस आहे. मी आज फक्त कार्यालय बघायला आलोय”, असे त्यांनी म्हटले.