मला नाही वाटत…, काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याच्या पवाारंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
शरद पवार यांनी देशातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे संकेत नुकतेच दिलेत. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर केवळ राज्यातच नाहीतर देशातील राजकारणात खळबळ उडवून दिल्याचे पाहायला मिळाले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी देशातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून दिलेत. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर केवळ राज्यातच नाहीतर देशातील राजकारणात खळबळ उडवून दिल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, शरद पवार मनामध्ये असते तेच करतात, परंतु दाखवताना तो सामूहिक निर्णय असल्याचे दाखवतात. शरद पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य केली जातात. त्यांना पाहिजे तेच ते करतात. तो त्यांचा स्वभाव आहे. तो बदलणे शक्य नाही, असे स्पष्टपणे अजितदादा म्हणाले. तर ठाकरे काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील असे वाटत नाही. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाहिले आहे. एकंदरीत ते असा काही निर्णय घेण्याची शक्यता नाहीच, असेही अजित पवार म्हणाले.