Ram Mandir Inauguration : मंत्रिमंडळासह सर्वजण अयोध्येला जाणार? अजित पवार उद्याच्या सोहळ्याबद्दल काय म्हणाले?
येत्या सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. तर अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी अवघे काही तास शिल्लक...याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शासकीय इमारतींवर रोषणाई करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली तर सर्व मंत्रिमंडळासह अयोध्येत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई, २१ जानेवारी, २०२४ : येत्या सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. तर अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी अवघे काही तास शिल्लक आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शासकीय इमारतींवर रोषणाई करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली तर सर्व मंत्रिमंडळासह अयोध्येत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मला आणि एकनाथ शिंदे यांना त्याठिकाणी निमंत्रण होतं. आम्ही त्यानिमित्त आज निघणार होतो. परंतु काल मी एका ठिकाणी असताना एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की, आपल्या दोघांना निमंत्रण आहे, पण आपण सर्व मंत्रिमंडळाला घेऊन काही दिवसांनी तारीख ठरवू आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्यावतीने जाऊ; असे अजित दादा म्हणाले, कारण त्याठिकाणी आम्हाला दोघांना निमंत्रण होतो आणि मंत्रिमंडळातील नेत्यांना त्याठिकाणी जाता येणार नव्हतं, त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.