शायना एन.सी यांच्या ‘त्या’ आरोपानंतर अजितदादा म्हणाले, ‘माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..’

| Updated on: Nov 01, 2024 | 5:51 PM

ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन. सी. यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. यावर अजित पवार काय म्हणाले?

ठाकरे गट शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शायना एनसी यांना माल असं संबोधलं, असा आरोप शायना एनसी केला. दरम्यान, याप्रकरणी खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असून अरविंद सावंत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘वाचाळवीरांनी स्वतःला आवार घालावा’, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुढे ते असेही म्हणाले, सर्वांना माझ्यासकट सगळ्यांना आवाहन करेन की, आपल्या महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यावेळी चव्हाण यांनी आणला दोन वर्ष ते मुख्यमंत्री राहिले. त्यांनी सुसंस्कृतपणा राजकारणात कसा असावा, राजकारणात शब्दप्रयोग कसे केले जावे, विरोधकांना कसा रिस्पेक्ट द्यावा आणि वाचाळवीरांनी आपल्या वाचाळाला आवर घालावा, असे अजित पवार म्हटले.

Published on: Nov 01, 2024 05:51 PM
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार, प्रकरण काय?
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात, बानवकुळेंसोबत मॅरेथॉन बैठका अन्….