अजित दादांची मोठी कबुली; म्हणाले, ‘आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं…’

| Updated on: Aug 13, 2024 | 3:43 PM

लोकसभा निवडणुकीत बारामतीतून पत्नीला बहिणीविरुद्ध उमेदवारी देणे हे चूकीचे होती, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी व्यक्त केले. आज माझ मन मला सागतंय मी हे करायला नको होतं. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणं मोठी चूक होती. बहीण सुप्रियाविरोधात नणंद सुनेत्रा पवार यांना उभं करायला नको होतं. आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं, असे म्हणत अजित पवार यांनी मोठी कबुली दिली आहे. तर रक्षाबंधनाच्या वेळी मी तिकडे असेल तर मी राखी बांधून घ्यायला नक्की बहिणीकडे जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. या वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अजित पवार राज्यव्यापी ‘जन सन्मान यात्रे’वर आहेत. दरम्यान, मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, घरात राजकारण होऊ देऊ नये. माझ्या सर्व बहिणींवर माझे प्रेम आहे. माझ्या बहिणीविरुद्ध सुनेत्रा यांना लोकसभेच्या मैदानात उतरवून मी चूक केली. असे घडायला नको होते. मात्र (राष्ट्रवादी) संसदीय मंडळाने हा निर्णय घेतला होता. पण आता मला वाटतंय की हा निर्णय चुकीचा होता, असे म्हणत दादांनी कबुली दिली आहे.

Published on: Aug 13, 2024 03:43 PM
‘राऊत अन् वडेट्टीवार एकदम बेशरम निर्लज्ज, त्यांनी लोकांच्या…’, विरोधकांच्या टीकेवरून राणांचा पलटवार
‘मला नाराज करणारा अजून जन्माला…’, महायुतीत नाराज असल्याच्या चर्चांदरम्यान बच्चू कडूंचं वक्तव्य