Ajit Pawar On Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांचा टोला

| Updated on: Feb 24, 2023 | 12:52 AM

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांबाबतच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. पाहा काय म्हणाले अजित पवार...

चिंचवड : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना mpsc बाबतीत प्रश्न विचारला ते म्हणतात की, निवडणू आयोगाकडे पाठवतो. राज्याचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही. मी मुद्दाम बोलतोय. आपल्याकडून पण बोलताना एकदा चूक होते. पण हे चार वेळा निवडणूक आयोग, निवडणूक आयोग म्हणत होते.’

‘पेट्रोल, डिझेल, सिमेंट, स्टील, गॅस, दुचाकी यांची 2014 चे दर आणि आत्ताचे दर सांगत भाजपला घेरले. मी सांगतोय घड्याळाकडे बघा तर तुमचं काय? कमळाबाई, कमळाबाई करताय मग घ्या आता. आता कसं वाटतंय, गार-गार वाटतंय. स्वयंपाक करताना कसं, बरं वाटतंय का?’ असं ही अजित पवार म्हणाले.

Published on: Feb 24, 2023 12:52 AM
Uddhav Thackeray : ‘अपात्रतेचा निकाल आला तर राज्यात मध्यावधी’- उद्धव ठाकरे
Ravindra Dhangekar : ‘ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी विजय निश्चित झाला’- रविंद्र धंगेकर