वेशांतर अन् सत्तांतर…सत्तेत जाण्याआधी काय घडलं? अजितदादांनी उघडली सत्तेची सिक्रेट फाईल
अजित पवार यांचं बंड आणि सत्ता समावेशाच्या नाट्यात खुद्द अजित पवार यांनी वेशांतर करून दहा वेळा दिल्ली गाठली. या गुप्त बैठकाची गुपीत अजित पवारांनीच उघड केली आहे. जवळपास वर्षभरानंतर आपण सत्तेत कसे गेलो? याची कहाणीच अजित पवार यांनी पहिल्यांदा उलगडली आहे..
एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी देवेंद्र फडणवीस हे वेशांतर करून गुवाहाटी गेल्याच्या चर्चा मध्यंतरी चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र अजित पवार यांचं बंड आणि सत्ता समावेशाच्या नाट्यात खुद्द अजित पवार यांनी वेशांतर करून दहा वेळा दिल्ली गाठली. या गुप्त बैठकाची गुपीत अजित पवारांनीच उघड केली आहे. जवळपास वर्षभरानंतर आपण सत्तेत कसे गेलो? याची कहाणीच अजित पवार यांनी पहिल्यांदा उलगडली आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलत असताना सत्तेत सामील होण्यापूर्वी अजित पवार दिल्लीत कसे जात होते? त्यासाठी कसं वेशांतर करत होते, याचीच माहिती अजित पवारांनी दिली. २ मे २०२३ रोजी शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल हे राजीनाम्याच्या बाजूने होते. मात्र इतरांच्या विरोधामुळे शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला. महिनाभरानं २ जून २०२३ रोजी दादांनी बंड केलं आणि पुढे काय झालं… बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट