Ajit Pawar | पुण्यातील कबड्डीपटू मुलीच्या हत्येने मान खाली, राक्षसांना वेळीच ठेचायला हवं, अजितदादांचा संताप
बिबवेवाडीतील कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री उशिरा बिबवेवाडीतून त्यांना ताब्यात घेण्यात आलं, मात्र मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदार अद्यापही फरार आहेत. आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांच्या टीम तयार आहेत.
“पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे” अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
बिबवेवाडीतील कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री उशिरा बिबवेवाडीतून त्यांना ताब्यात घेण्यात आलं, मात्र मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदार अद्यापही फरार आहेत. आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांच्या टीम तयार आहेत.
Published on: Oct 13, 2021 10:06 AM