मुंबईत येऊन जर कायदा हाती घेतला तर…, अजित पवार यांचा थेट जरांगे पाटलांना इशारा
चार महिन्यांनंतर का होईना अखेर अजित पवार गटाने मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकरट आरक्षण देण्याची मागणी जर कायद्यात बसत नसेल तर कसं द्यायचं असा सवाल करत अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारच दिलाय.
मुंबई, ८ जानेवारी २४ : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत अजित पवार गटाची भूमिका पहिल्यांदाच स्पष्ट झाली आहे. मुंबईत येऊन जर कायदा हाती घेतला तर मुलाहिजा ठेवणार नाही, असा इशाराच अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना दिला. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांची मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत भूमिका बदलली आहे का? अशीही चर्चा सुरू झाली आहे. चार महिन्यांनंतर का होईना अखेर अजित पवार गटाने मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकरट आरक्षण देण्याची मागणी जर कायद्यात बसत नसेल तर कसं द्यायचं असा सवाल करत अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारच दिलाय. तर भुजबळ यांच्या प्रतिक्रियेवर नाव न घेता प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. ज्यांचा अधिकार आहे त्यांना दिलंच पाहिजे असं म्हणत काही उपटसुंभ असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. बघा स्पेशल रिपोर्ट