‘सोबत’ नाही तर ‘तटस्थ’, अजित पवार यांचे ते दोन पर्याय काय? बघा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | पुण्यातील पवार काका-पुतण्यांच्या भेटीची चर्चा काही केल्या थांबेना...तर उद्या बीडच्या सभेपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना काय दिला धडकी भरवण्याचा इशारा?
मुंबई, १६ ऑगस्ट २०२३ | पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांनी दोन पर्याय दिलेत, मात्र ते दोनही पर्याय शरद पवार यांनी फेटाळून लावल्याचे सांगितले जात आहे. याऊलट अजित पवार गटाच्या मंत्र्यांविरोधातच शरद पवार उद्या सभा घेणार आहेत. उद्या बीडच्या सभेपूर्वीच शरद पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनी धडकी भरवण्याचा इशारा दिलाय. पुण्यातील पवार काका-पुतण्यांच्या भेटीची चर्चा काही केल्या थांबत नाहीये. त्यातच अजित पवार यांनी शरद पवार यांना दोन पर्याय दिलेत. शरद पवार सोबत येत नसतील निवृत्ती घेऊन तटस्थ राहावं… आणि दुसरं म्हणजे शिवसेनेसारखी अवस्था होऊ नये यासाठी पक्ष एकसंध राहणं गरजेचं… जर पक्षाचे दोन गट झाल्यास निवडणुकीत फटका बसणार, असे अजित पवार यांचं म्हणणं आहे. तर कोर्ट केसेस आपल्याला परवडणाऱ्या नाहीत असंही अजित पवार यांनी म्हटलंय. मात्र शरद पवार यांनी सर्व पर्याय फेटाळले असून पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…