अजित पवारांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना घड्याळ्याचं तिकीट

| Updated on: Oct 30, 2024 | 11:45 AM

भाजपाच्या विरोधाला न जुमानता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांना उमेदवारी दिली. त्यावर आम्ही नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली.

भाजपच्या विरोधाला ठेंगा दाखवत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मवर नवाब मलिकांना उमेदवारी दिली. आता ज्या भाजपाने नवाब मलिक यांच्याविरोधात देशद्रोहासह गंभीर आरोप केले होते. तेच मलिक आता एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. त्यावर मलिक तुरूंगातून बाहेर आल्यावर भाजपविरोधात गप्प कसे झालेत? असे म्हणत विरोधकांनी मलिकांना बोलण्याचं आव्हान दिलंय. मुंबईच्या अणुशक्तीनगर या मतदारसंघातून नवाब मलिकांची लेक सना मलिक यांच्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून फहाद अहमद रिंगणता आहे. तर मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नवाब मलिक यांच्याविरोधात मविआचे उमेदवार अबू आझमी निवडणूक लढवणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं होतं. याच दरम्यान, त्याचं तिकीट पक्षानं नाकारलं असल्याने ते अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम होते. अशातच काल विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवट दिवस असल्याने त्या शेवटच्या दिवसांपर्यंत मलिकांच्या उमदेवारीबाबत निश्चितता नव्हती. मात्र त्यांना अजित पवार यांनी एबी फॉर्म देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली.

Published on: Oct 30, 2024 11:45 AM
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कुठे-कुठे कोणाविरोधात कोण करणार बंड?
अजित पवारांच्या नक्कलेला शरद पवारांचा मिमिक्रीने पलटवार, लोकसभेला केलेल्या मिमिक्रीचं विधानसभेला प्रत्युत्तर