Ajit Pawar : ‘बेशिस्तपणा, त्यांना सरळ सांगायचं दादांना…’, अजित पवार एसपी नवनीत कॉवत यांच्यावर संतापले
अजित पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बीड जिल्ह्यात हेलिपॅडवर दाखल होताच अजित पवार हे बीडच्या नवनीत कॉवत यांच्यावर संतापल्याचे पाहायला मिळाले.
उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. बीडमध्ये दाखल होताच अजित पवार हे एसपी नवनीत कॉवत यांच्यावर संतापल्याचे पहायला मिळाले. अजित पवार बीड जिल्ह्यात दाखल होताच हेलिपॅडपर्यंत लोकं आल्याने अजित पवार भडकल्याचे दिसले. दरम्यान, आज अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बीडच्या पक्ष कार्यालयात लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यासह अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये काही पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. ‘अजिबात कोणाचे लाड चालणार नाही. हे काय चालंलय? एवढी लोकांची गर्दी? मी महाराष्ट्रात फिरतो पण असं पद्धत कुठे नसतं. बेशिस्तपणा… त्यांना सरळ सांगायचं दादांना आवडत नाही. लाईन लावायची किती गर्दी… हेलिपॅडवर लोकांची गर्दी…’, असं अजित पवार म्हणाले आणि बीडच्या एसपी यांच्यावर काहीसे संतापल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ…