नेतृत्व, विश्वास अन्… राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह मिळाल्यानंतर मुंबईत अजित पवार यांची तुफान बॅनरबाजी

| Updated on: Feb 07, 2024 | 1:37 PM

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता मुंबईत अजित पवार यांचे जागोजागी बॅनर झळकलेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा निकाल काल जारी केल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार अशा दोन्ही गटाकडून मुंबईत ठिक-ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४ : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता मुंबईत अजित पवार यांचे जागोजागी बॅनर झळकलेत. अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळालंय तर या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. तर वांद्रे-वरळी सीलिंक परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरद्वारे अजित पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा निकाल काल जारी केल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार अशा दोन्ही गटाकडून मुंबईत ठिक-ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. सत्याचा विजय, लोकशाहीचा विजय अशा आशयाचे बॅनर अजित पवार गटाकडून झळकवण्यात आले आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह राखू ठेवल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार अजित पवार गटाकडून मानन्यात आले आहे. बघा बॅनरवर नेमका काय लिहिलाय आशय?

Published on: Feb 07, 2024 01:37 PM
चिन्ह तुम्हारा, बाप हमारा… आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाची कुठं बॅनरबाजी?
उलट्या, मळमळ अन्… संत बाळूमामा यांच्या कार्यक्रमात हजारो लोकांना विषबाधा