तासाभराच्या वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?

| Updated on: Jul 15, 2024 | 1:00 PM

सर्वपक्षीय बैठकील महाविकास आघाडीचे नेते, विरोधक या बैठकीला येणार होते. पण त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता बारामतीमधून एक फोन आला आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला असं वक्तव्य करत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप काल केला होता आणि आज...

Follow us on

मराठा आरक्षणासाठी सह्याद्रीवर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीचे नेते, विरोधक या बैठकीला येणार होते. पण त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता बारामतीमधून एक फोन आला आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला असं वक्तव्य करत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप काल केला होता. त्यानंतर आज सकाळी छगन भुजबळ अचानक सिल्वहर ओकवर शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. मात्र यावेळी त्यांना पाऊन तास वेटिंगवर रहावं लागलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. छगन भुजबळ यांनी काल पवारांवर गंभीर आरोप केला आणि आज अचानक भेट का घेतली? कारण काय असेल? असे सवाल सध्या उपस्थित केले जात आहे. भुजबळ गेल्या तासाभरापासून शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर होते. आणि वेटिंगनंतर त्यांची भेट झाली. या कृतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून सगळ्यांचेच या भेटीकडे लक्ष लागले होते.